पाचगणी-महाबळेश्वर पर्यटकांना खुणावू लागले

Pachgani-Mahabaleshwar began to attract tourists

सातारा : सातारा जिल्ह्यातील पर्यटन पुन्हा नव्याने गतिमान होवू लागले आहे. कोरोनाचा कहर कमी होत चालला असून नागरिकांची दैनंदिनी सुरु झाली आहे. त्यामुळे पर्यटनालाही गती येवू लागली आहे. जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणी, प्रतापगड, कास, बामणोली, ठोसेघर, भांबवली-वजराई, तापोळा, औंध, कोयनानगर, फलटण, वाई अशी अनेक पर्यटनस्थळे पर्यटकांना खुणावू लागले. येथील पर्यटनाला प्रशासनाने परवानगी द्यायला सुरुवात केली आहे. महाबळेश्वरचे वेण्णालेक (Mahabaleshwar) आजपासून सुरु होत आहे. अन्य पाईंटही सुरु होत आहेत. याशिवाय अन्यत्रही पर्यटकांची गर्दी (Attract tourists)होवू लागली आहे.

महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण म्हणून केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देश पातळीवर लौकिकास आले आहे. तर जुने क्षेत्र महाबळेश्वर हे धार्मिक स्थळ आणि पंचनद्यांचा उगम म्हणून सर्वपरिचित आहे. महाबळेश्वर येथे कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो. या ठिकाणी ऐतिहासिक पंचगंगा मंदिर तसेच स्वयंभू शिवलिंगाचे महाबळेश्वर मंदिर आहे. परिसरातील अनेक पॉईंटस हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरले आहेत. सनराईज किंवा विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, केट्स पॉईंट व त्यालाच जोडून असलेला नीडल होल पॉईंट किंवा हत्तीचा माथा, विल्सन पॉईंट, मंकी पॉईंट, लॉडविक पॉईंट, टायगर्स स्प्रिंग, कार्नेक पॉईंट, हेलेन्स पॉईंट, एलफिन्स्टन पॉईंट, बॅबींग्टन पॉईंट, बॉम्बे पॉईंट ही पर्यटकांची आवडती ठिकाणे आहेत.

पाचगणी हेही थंड हवेचे ठिकाण असून तेथील टेबल लँड या ठिकाणास भेट दिल्याशिवाय पर्यटक परतत नाहीत. सिडनी पॉईंट, पारसी पॉईंट, डेव्हील्स किचन, मॅप्रो गार्डन याशिवाय मॉरल रिआर्मामेट सेंटरही येथे आहे. पाचगणी हे निवासी शाळांसाठी प्रसिद्ध असून देश-विदेशातून विद्यार्थी शिक्षणासाठी या ठिकाणी येत असतात. पाचगणी पासून जवळच असलेलं स्ट्रॉबेरीचं गाव म्हणून ओळख असलेलं आणि मागच्या काही वर्षात पुस्तकाचे गाव म्हणून नावा रुपाला आलेले भिलार आणि बाजूची गावंही आता पर्यटकांनी बहरत आहेत. या दर्जामुळे या गावांच्या अर्थकारणावर परिणाम होईल. याशिवाय महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी, मध, जॅम, क्रशेस, चिक्की पर्यटकात प्रसिद्ध आहे. येथील माल्कमपेठ या नावाने प्रसिद्ध असलेली बाजारपेठ पर्यटकांचे आणखी एक आकर्षण आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER