सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पी. शिवशंकर यांची नियुक्ती

solapur news-mahanagarpalika

सोलापूर :- ‘काेरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा फटका आता प्रशासकीय यंत्रणेला बसू लागला आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली करण्यात आली असून, त्यांच्या ठिकाणी वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरात काेरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्या कामाबद्दल वरिष्ठ पातळीवरून नाराजी व्यक्त केली जात होती. पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शुक्रवारी शहरात आढावा बैठक घेतली. यानंतर सायंकाळी महापालिका आयुक्त तावरे यांची बदली करण्यात आल्याचा आदेश नगरविकास खात्याकडून निर्गमित केला गेला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER