पंतप्रधान-आरोग्यमंत्री जबाबदारी झटकताहेत, लोकशाहीची थट्टा; पी. चिदंबरम यांचा आरोप

नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत ४ लाख १४ हजार १८८ नवे रुग्ण आढळले तर ३ हजार ९१५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ३६ लाख ४५ हजार १६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर १ कोटी ७६ लाख १२ हजार ३५१ रुग्ण बरे झालेत. दरम्यान, कोरोना परिस्थितीवरून काँग्रसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन (Harshavardhana) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्र्यांनी आपल्या जबाबदारीपासून हात झटकले आहेत. लोकशाहीच्या तत्वांची थट्टा सुरू आहे” असा आरोप पी. चिदंबरम यांनी केला आहे. “महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. कोरोना प्रतिबंधक लसींचा अपुरा पडत आहे. हे एक कटू सत्य आहे. पण सरकार हे नाकारत आहे. तामिळनाडूमध्ये ४५ वर्षांहून अधिक वयोगटांना पहिला डोस मिळत नाही आणि दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अत्यल्प आहे.” असे पी. चिदंबरम यांनी सांगितले.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button