
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज (1 फेब्रुवारी) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांनी सडकून टीका केली. अर्थमंत्र्यांनी भारतातील गरिब, होतकर, मजूर, शेतकरी आणि बेरोजगारांना यांना धोका दिला आहे. अर्थमंत्र्यांनी संसदेत त्यांचं भाषण ऐकणाऱ्या खासदारांसह सर्व लोकांची फसवणूक केली आहे, असा टोला चिदंबरम यांनी लगावला.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुरक्षा खात्यासाठी किती पैशांची तरतूद केली याबाबत फारसे स्पष्टीकरण दिलेले नाही. याशिवाय आरोग्य विभागासाठी ज्या आकड्यांचा उल्लेख केला त्यामध्ये लसीचे पैसे जोडले आहेत. याशिवाय फायनान्स कमीशनची ग्रँटभी जोडण्यात आली आहे. अर्थसंकल्पात सुरक्षा आणि आरोग्य विभागासाठी कोणतीच कमी सोडायला नको. हे आम्ही याआधीच सांगितलं आहे, असं चिदंबरम म्हणाले.
काही राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता मोठमोठ्या किंमतीची तरतूद केली आहे. मात्र, लोक वेडे नाहीत. त्यांना माहिती आहे, ही फक्त घोषणा आहे. पैश्यांची पूर्तता करण्यात अनेक वर्ष लागतील. या बजेटमधून फक्त निराशाच हाती लागली आहे. गेल्या वर्षासारखं या वर्षीदेखील काही दिवसांमध्ये बजेटची पोलखोल होईल. ट्रक्स रिलिजचा गरिब लोकांना नाही तर फक्त श्रीमंत लोकांना फायदा होईल, अशी भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला