
मुंबई :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचं (यूपीए)अध्यक्षपद (upa-chairmenship) सोपवण्यासंबंधी राजकीय वर्तुळात उलट -सुलट चर्चा सुरु आहेत . काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम (P. Chidambaram) यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांची युपीए अध्यक्ष होण्याची इच्छा असेल असं मला वाटत नाही असं पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे. हे काही पंतप्रधानपद नाही आणि स्वत: शरद पवार यांची युपीए अध्यक्ष म्हणून जाहीर केलं जावं अशी इच्छा नसावी,असे पी चिदंबरम यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांचीही युपीए अध्यक्ष म्हणून आपल्या नावाची घोषणा किंवा निवड व्हावी अशी इच्छा नसेल. जेव्हा बैठक होईल तेव्हा योग्य व्यक्तीची निवड केली जाईल. आम्ही पंतप्रधानांची निवड नाही करत आहोत, असे पी चिदंबरम यांनी म्हटले आहे. युपीए अध्यक्ष अशी काही गोष्टच नाही असेही ते म्हणाले आहेत.
जर मित्रपक्षांची बैठक बोलावली तर काँग्रेस अध्यक्ष त्याचे नेतृत्व करणार हे नैसर्गिक आहे असे ते म्हणाले आहेत. युपीएची बैठक घेण्यासाठी काही पक्ष पुढाकार घेऊ शकतात आणि काँग्रेस त्यात सहभागी होईल. पण जर काँग्रेसने बैठक बोलावली असेल तर काँग्रेसचाच नेता बैठकीचं नेतृत्व करेल, असे पी चिदंबरम यांनी सांगितले आहे.
ही बातमी पण वाचा : शरद पवारांचे बाबूंच्या पोस्टिंगबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला