एसटीचे ड्रायव्हर आणणार ऑक्सिजन टँकर; अनिल परब यांची माहिती

मुंबई :- केंद्र सरकारने (Central Govt) बाहेरच्या राज्यातून ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकारला परवानगी दिली आहे. मात्र, ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी सरकारला ड्रायव्हरच मिळे ना… त्यामुळे आता एसटीचे ड्रायव्हर हे ऑक्सिजन टँकर चालवणार आहेत. याबाबतची माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.

अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. “राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेल्वे मंत्रालयाकडून ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्यांचे समन्वय परिवहन विभाग करत आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे काही टँकर्सचे ड्रायव्हर्स गावाला निघाले. यामुळे ड्रायव्हर्स आणायचा कुठून, हा प्रश्न निर्माण झाला आहे. म्हणून आम्ही परिवहन विभागाचे ड्रायव्हर्स ऑक्सिजनचे टँकर आणण्यासाठी उपलब्ध करून देणार आहोत, असे अनिल परब म्हणाले.

ऑक्सिजनचा पुरवठा आजच होणार

“आजपासूनच ऑक्सिजनचा पुरवठा होणार आहे. यासाठी आरोग्य विभागाशी समन्वय साधला जात आहे, अशी माहिती परब यांनी दिली. राज्य सरकारने फेरीवाला, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी मदत पॅकेज जाहीर केले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सोशल माध्यमाद्वारे बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्य सरकारने मदत देण्यास सुरुवात केली आहे.” असे परब म्हणाले.

राज्यपाल आणि सरकारमधला वाद

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governer Bhagat Singh Koshyari) यांना गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमान देण्यात आले. यामुळे राज्यपाल आणि सरकारमधला वाद संपला आहे का? असा सवाल करण्यात आला. यावर राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता, असे ते म्हणाले. ब्रुक फार्माच्या संदर्भात गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे मला यावर काही बोलायचे नाही, असे अनिल परब म्हणाले.

ही बातमी पण वाचा : महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन ; पीयूष गोयल यांची माहिती 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button