ऑक्सिजन टँकर पुण्यात अडवला, मी फोन करून वेगळ्या भाषेत समजावल्यावर सोडला : बाळासाहेब थोरात

balasaheb thorat - Maharastra Today
balasaheb thorat - Maharastra Today

अहमदनगर : राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अहमदनगरमध्ये ऑक्सिजनअभावी मंगळवारी रात्री बऱ्याच रुग्णांचा जीव धोक्यात आला. या रुग्णांसाठी ऑक्सिजनचा टँकर तातडीने मागवण्यात आला होता. मात्र, हा टँकर रात्री पुण्यात अडवला. त्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी हस्तक्षेप करून हा ऑक्सिजन टँकर सोडवला. यामुळे रुग्णांचा जीव थोडक्यात वाचला.

बुधवारी बाळासाहेब थोरात यांनी अहमदनगर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यासंदर्भाची माहिती दिली. कालची रात्र आमच्यासाठी भयानक होती. ऑक्सिजनचा टँकर वेळेत पोहचला नसता तर किती रुग्णांचे मृत्यू झाले असते, हे सांगता येऊ शकत नाही. अहमदनगरकडे येणारा हा ऑक्सिजन टँकर पुण्यात थांबवण्यात आला होता. मात्र, मी फोन करून वेगळ्या भाषेत समजावल्यावर हा टँकर सोडण्यात आला, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ऑक्सिजनचा तुटवडा संपला
अहमदनगर जिल्ह्याला एकूण ६० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज होती. काल अचानक जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. मात्र, प्रशासनाने प्रयत्न केल्यामुळे ऑक्सिजन पोहचला. यानंतर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी रुग्णालयांमध्ये रात्री ३ वाजेपर्यंत ऑक्सिजन वितरित करण्यात आला. यामुळे कोरोना रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, गुरुवारपासून नगर शहरात ऑक्सिजन प्लांट सुरू होत आहे. त्यामुळे भविष्यात ऑक्सिजन तुटवडा भासणार नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button