नाशिकमध्ये झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक लीक; २२ जणांचा मृत्यू

nashik Oxygen Tank leak - Maharastra Today
nashik Oxygen Tank leak - Maharastra Today

नाशिक :- राज्यात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झालेला आहे, तर दुसरीकडे नाशिकमधील (Nashik) महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची दुर्घटना समोर आली आहे. गळती बंद करण्यासाठी तांत्रिक पथकाबरोबरच अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. या ऑक्सिजन गळती दुर्घटनेत २२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, सद्यस्थितीत अग्निशमन दलाकडून गळती थांबवण्याचे काम सुरू आहे.

नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी १२.३०च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी शर्थीचे प्रयत्नदेखील सुरू आहे. या रुग्णालयात १५० लोक व्हेंटिलेटरवर होते. यात २२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ३० जण मृत्यूच्या दाढेत असल्याची माहिती मिळत आहे. जवळपास १३१ रुग्ण ऑक्सिजनवर आहे. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. या संपूर्ण घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे.

दरम्यान, ही घटना नेमकी कशी घडली, हा ऑक्सिजन टँक लीक कसा झाला, याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र या हलगर्जीपणामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button