महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन; पीयूष गोयल यांची माहिती

Piyush Goyal

मुंबई :- देशात कोरोनाने थैमान (Corona crises) घातले आहे . या पार्श्वभूमीवर कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी राज्यांनी केंद्र सरकारकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली होती. यानुसार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी राज्यांना करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर वृत्तसंस्था एएनआयला सविस्तर माहिती दिली आहे. पीयूष गोयल म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला सर्वांत जास्त १५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १२ राज्यांशी तपशीलवार बैठक घेण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना विविध गरजांच्या अनुषंगाने रूपरेखा ठरवली आहे.

याच अनुषंगाने एकूण ६१७७ मेट्रिक टन ऑक्सिजन राज्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. गोयल म्हणाले की, महाराष्ट्राला सर्वांत मोठा वाटा मिळणार असून तब्बल १५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. दिल्लीला ३५० मेट्रिक टन आणि उत्तरप्रदेशला ८०० मेट्रिक टनाचा पुरवठा करण्यात येईल. कोरोना महामारीच्या आधी देशात मेडिकल ऑक्सिजनचा १००० ते १२०० मेट्रिक टन खप होता.

परंतु १५ एप्रिलच्या आकडेवारीनुसार ४,७९५ मेट्रिक टनांपर्यंत मेडिकल ऑक्सिजनचा वापर देशात होतोय. मागच्या वर्षभरात आम्ही ऑक्सिजनच्या उत्पादन क्षमतेत वाढ केली आहे. गोयल यांनी नमूद केले की, २२ एप्रिलपासून महत्त्वाची ९ क्षेत्रे वगळता इतर औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा वापर करण्यास बंदी घालण्यात येत आहे. ही तात्पुरती तरतूद असेल. सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.

ही बातमी पण वाचा : संवेदनशील राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाश्याना ४८ तासांपूर्वीची कोरोना चाचणी अनिवार्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button