कर्नाटकला होणारा ऑक्सिजन पुरवठा थांबवणार : सतेज पाटील

Satej patil

कोल्हापूर : कोल्हापुरातून कर्नाटक ( Karnataka ) होणारा ऑक्सिजन पुरवठा (Oxygen supply) रोखण्याचा विचार असल्याचे गृह राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी सांगितले. सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमुळे कोल्हापूरवर ताण येत असल्याचेही त्यांनी सांगितले. नव्याने लॉकडाऊन करणे आता शक्य नाही. यामुळे नागरिकांनीच स्वत:ची काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या दहा हजारांपर्यंत पोहोचली आहे. त्या तुलनेत जिल्ह्यातील रुग्णालयांतील उपलब्ध बेडची संख्या कमी पडण्याची भीती आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत आहे. त्यातच यापुढेही रुग्णसंख्या वाढत जाणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी कर्नाटक जाणाऱ्या ऑक्सिजनसह औद्योगिक क्षेत्राला देण्यात येणारा ऑक्सिजन पुरवठा रोखण्याबाबत विचार केला जात असल्याचे सांगितले.

तिसरा अनलॉक झाल्यानंतर प्रचंड प्रमाणात कोल्हापुरात लोक दाखल झाले. यामुळे समूह संसर्गासारखी रुग्णसंख्या वाढत चालली आहे. प्रशासन म्हणून ऑक्सिजन बेड असतील, एएफएनसी असतील, त्यांची उपलब्धता करून देत आहोत. बेडचा डॅशबोर्ड तयार करण्यात आले आहे असे मंत्री पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER