ऑक्‍सिजनचे पाणी न बदलल्याने वाढतो ‘म्युकोरमायकोसिस’चा धोका – अजित पवार

Maharashtra Today

बारामती : कोरोनाच्या (Corona)साथीनंतर आता ‘म्युकोरमायकोसिस’चे (mucormycosis)रुग्ण वाढत आहेत. या आजाराच्या उपचारासाठी खूप खर्च येतो. या आजारावरचे औषध – उपचार महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) म्हणाले की, ऑक्‍सिजनमध्ये वापरले जाणारे पाणी वेळेवर बदलणे आवश्‍यक आहे. यासह अन्य कारणांमुळे हा आजार होतो. असे महाराष्ट्र टास्कफोर्सने सांगितले आहे.

कोरोना लसीच्या पुरवठ्याबाबत ते म्हणाले की, देशाला जेवढी लस हवी आहे त्या प्रमाणात मिळत नाही, त्यामुळे ठिकठिकाणचे लसीकरण केंद्र बंद पडत आहेत. सीरम कंपनी लसीचे उत्पादन करते. भारत बायोटेकसाठी पुण्यात जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

लसींची मागणी एकदम वाढल्यामुळे १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबवण्यात आले आहेत.लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात ४५ वयोगटाच्या पुढील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. १ मे पासून १८ वर्षांपुढील सर्वांसाठीच लस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button