ऑक्सिजन तुटवड्याला केंद्र कारणीभूत; भारताला हात पसरावे लागतंय : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड :- देशात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Crises) कायम आहे. रुग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहेत. देशात ऑक्सिजनअभावी जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, याला पूर्णपणे केंद्र सरकारच (Central Govt.) जबाबदार आहे. असा आरोप काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिवांच्या २० ऑक्टोबर २०२० ला घेतलेल्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते. “वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठ्याबाबत भारत अत्यंत सुस्थितीत आहे. मागील १० महिन्यात वैद्यकीय ऑक्सीजनचा कोणताही तुटवडा जाणवला नाही आणि जाणवणार नाही.” असे ५ महिन्यापूर्वी दिल्लीत झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय पत्रकार परिषदेत सचिवांनी सांगितले, असे चव्हाण म्हणाले.

“सचिवांच्या पत्रकार परिषदेतून हे स्पष्ट होते की, सरकारने अतिरिक्त १ लाख MT ऑक्सिजन आयात खरेदीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, मोदी सरकारने ती कार्यान्वित केली नाही, यामुळे आज देशाला अभूतपूर्व ऑक्सिजन तुटवडा भासत आहे. रुग्णांना रूग्णालयात दाखल करण्यास काही रुग्णालये नकार देत आहेत. ऑक्सिजनअभावी बरेच रुग्ण दगावले आहेत. ऑक्सिजन मिळवण्यासाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. हे अत्यंत विदारक चित्र आहे, असे चव्हाण म्हणाले.

ऑक्सिजनसाठी हात पसरावे लागतंय

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जानेवारी २०२१ मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण केले. यावेळी त्यांनी “भारताने कोरोनाला कसे हरवले” अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा प्रयत्न केला. जगातील ५० पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्सिजन मिळविण्यासाठी आपल्याला त्यांच्यासमोर हात पसरावे लागत असल्याची खंत चव्हाणांनी बोलून दाखवली.

राजीनाम्याची मागणी

आज देशाला मोदी सरकारने केलेल्या या अक्षम्य चुकांची आणि वेळेत निर्णय न घेतल्यामुळे देशाला मोठी किंमत मोजावी लागत आहे. देशाच्या या दुरावस्थेला जबाबदार असलेले आरोग्य मंत्री आणि इतर जबाबदार सहकाऱ्यांना तातडीने पदच्युत केले पाहिजे, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

ही बातमी पण वाचा : केंद्रीय मागासवर्ग आयोगामार्फत मराठा आरक्षण द्या ;  उद्धव ठाकरेंचे नरेंद्र मोदींना पत्र  

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button