तालुकास्तरांवर ऑक्सिजन कोविड सेंटर व्हावेत ; राष्ट्रवादीच्या नेत्याचे शरद पवारांना साकडे

Sharad Pawar - Sangram Jagtap

मुंबई : नगरचे राष्ट्रवादीचे (NCP) आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच या दरम्यान कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर जगताप यांनी नगर जिल्ह्यात तालुकास्तरावर ऑक्सिजन कोविड सेंटर सुरू करण्याची तसेच कोविड प्रतिबंधक लस पुरवठा पुरेसा उपलब्ध होण्याची गरज मांडली. तसेच या दोन्ही बाबींसाठी शासनाला सूचित करण्याची विनंतीही पवारांकडे केली.

अहमदनगर जिल्ह्यात मागील काळात मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ झाल्याने उपचारासाठी जिल्ह्यातून रुग्ण नगर शहरात येत असल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण आल्याने अनेक रुग्णांना बेड उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा तसेच व्हेंटिलेटरची कमतरता इत्यादी बाबी प्रकर्षाने जाणवल्याचे त्यांनी पवारांना सांगितले.

तज्ज्ञांच्या मते जुलै-ऑगस्ट महिन्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे व या काळात मोठ्या प्रमाणात लहान मुले बाधित होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शासनामार्फत अद्ययावत सर्व सोयीसुविधायुक्त ऑक्सिजन कोविड सेंटर तालुकास्तरावर उभारण्याबाबत आपण शासनास सूचित करावे, अशी मागणीही त्यांच्याकडे केली. तसेच शासनाकडून जास्तीत जास्त प्रमाणात लसी उपलब्ध करून देण्याचीही गरज मांडली. त्यावर संबंधितांना आवश्यक सूचना देण्याची ग्वाही पवारांनी जगताप यांना दिली.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button