केईएम रुग्णालयात आज तीन जणांवर ऑक्सफर्ड लशीची चाचणी

oxford-vaccine-trial-to-start-at-mumbais-kem-hospital

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी विविध लस बाजारात येत आहेत. काही ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातील लसींची मानवी चाचणी सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड (oxford vaccine) व पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या ‘कोविशिल्ड’ लसीचा रुग्णांवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास पालिकेच्या केईएम रुग्णालयात (Kem Hospital) सुरू होणार आहे. शहरातील तीन स्वयंसेवकाना ही लस आज दिली जाणार आहे. लस देण्यासाठी आतापर्यंत १३ जणांच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. ऑक्सफर्ड आणि सिरम इन्स्टिटय़ूट यांच्या संयुक्त विद्यमाने केल्या जाणाऱ्या कोविडशील्ड या लशीच्या वैद्यकीय चाचण्या मुंबईत होणार आहेत.

एथिक्स समितीने परवानगी दिल्यानंतर केईएम रुग्णालयात करण्यात येणाऱ्या चाचण्यांना एथिक समितीची मंजुरी मिळाल्यानंतर १० स्वयंसेवकांच्या पीसीआर आणि अँटिबॉडी टेस्ट टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर लस दिली जात असल्याचे देशमुख यांनी सांगितले. लस टोचल्यानंतर या स्वयंसेवकांना दोन तास निरीक्षणाखाली ठेवले जाणार आहे. त्यांच्यावर काही दुष्परिणाम होतो का, हे पाहिले जाणार आहे. त्यानंतर एक महिन्यांनी पुन्हा लस दिली जाणार आहे. सिरम इन्स्टिटयूटकडून उत्पादन करण्यात येणाऱ्या या लशीचे भारतातील नाव ‘कोविशल्ड’ आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER