ऑक्सफर्ड लँग्वेजेसने ‘आत्मनिर्भर’ शब्द वर्ष २०२० चा हिंदी शब्द म्हणून निवडला

नवी दिल्ली :- ऑक्सफर्ड लँग्वेजेसच्या कृतिका अगरवाल, पूनम निगम सहाय आणि आय. फॉक्सवेल यांच्या समितीने ‘आत्मनिर्भर’ शब्द वर्ष २०२० चा हिंदी शब्द म्हणून निवडला आहे. कोरोना संकटकाळात प्रत्येक बाबतीत देशाने स्वयंपूर्ण बनावे, यासाठी पंतप्रधान मोदी यांनी देशवासीयांना आत्मनिर्भरतेचा मंत्र दिला होता. कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकारने जे पॅकेजेस जाहीर केले होते, त्यातही आत्मनिर्भरतेला सर्वाधिक महत्व देण्यात आले होते.

देशाने आत्मनिर्भर बनावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कोरोना संकटकाळात दिले होते. या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड लँग्वेजेसने ‘आत्मनिर्भर’ शब्द वर्ष २०२० चा हिंदी शब्द म्हणून निवडला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनानंतर आत्मनिर्भर शब्दाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. देशवासीयांत भारतीय शब्द वापरण्याचे प्रमाण गेल्या काही काळात वाढले असल्याचे दिसून येत आहे, असे ऑक्सफर्ड लँग्वेजेसकडून सांगण्यात आले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER