ऑक्सफोर्ड; कोरोनारोधक लसीची सर्व वयोगटांवरील स्वयंसेवकांवर चाचणी सुरू

Oxford University - Coronavirus Vaccine

लंडन : कोरोनारोधक साथीवरील लसीच्या चाचणीचा प्राथमिक टप्पा यशस्वी ठरल्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठात चाचणीचा पुढील टप्पा सुरू आहे. यासाठी हजारो स्वयंसेवकांची भरती करण्यात येणार आहे. यात सर्व वयोगटातील १० हजार २६० स्वयंसेवकांवर चाचण्या करण्यात येणार आहेत.

याबाबत एका वृत्त संस्थेशी बोलताना पोलार्ड म्हणाले की, या लसीच्या ‘क्लिनिकल’ चाचणींची प्रगती अपेक्षेनुसार सुरू आहे. वयस्क आणि जेष्ठ नागरिकांच्या प्रतिकारशक्तीवर, म्हणजे बहुसंख्य लोकांवर लसीचा काय परिणाम होतो, हे तपासणे सुरू आहे.

लसीच्या चाचणीच्या पहिल्या फेरीत१८ ते ५५ वर्ष वयोगटातील १६० निरोगी स्वयंसेवकांवर प्रयोग करण्यात आलेत. दुसऱ्या टप्प्यात पाच ते १२ वर्ष वयोगटातील बालकांसह वयस्क आणि जेष्ठ नागरिकांवर चाचणी करण्यात येणार आहे. तिसऱ्या फेरीत, ही लस मुख्यतः १८ वर्षांवरील लोकांवर काय परिणाम करते याचा अभ्यास करण्यात येणार आहे.

ऑक्सफोर्ड विद्यापीठ आणि फार्मा क्षेत्रातील मोठी कंपनी अस्ट्रा झेनेका (Astra Zeneca) यांच्यात करार झाला असून ब्रिटनसाठी ३० दशलक्ष डोस सप्टेंबर पर्यंत तयार करण्यात येतील.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER