मालकाच्या इटालियन मातोश्री, त्यामुळे रोज राहुलजींचे बुट पॉलिश; भाजपचा राऊतांना टोला

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला (PM Narendra Modi) आज सात वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला. नेहरू ते मनमोहन सिंगांपर्यंतच्या सरकारांनी अनेक योजना आणल्या. अनेक प्रकल्प उभे केले आहेत. त्यामुळे देशाची जडणघडण झाली. मागच्या या पुण्याईवर देश चालला आहे. राहुल गांधी यांचं म्हणणं सरकारनं  गांभीर्यानं ऐकलं पाहिजे, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भूमिकेचेही गुणगान गायले. यावरून भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला.

संजय राऊतांना अलीकडे नेहरूंच्या  नावाने खूपच उचक्या लागतात. ते अगदी पगारी नोकरासारखं वागत आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या काळात असं काही म्हणण्याचं  त्यांचं धाडस झालं असतं का? असा प्रश्न उपस्थित करत नव्या मालकांनी इटालियन मातोश्रींचे गळाबंधन बांधलेले आहे. त्यामुळे रोज राहुलजींचे बुटपॉलिश सुरू असते, असा खरमरीत टोला भातखळकर यांनी संजय राऊतांना लगावला.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button