धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून ओवैसी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत

Asaduddin Owaisi - Governor Bhagat Singh Koshyari - CM Uddhav Thackeray

मुंबई :- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यात काल हिंदुत्त्वावरून लेटरवॉर सुरू झाला. या वॉरमध्ये ‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमिन’ (AIMIM) चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) हेदेखील उतरले आहेत.

राज्यपालांनी अशी हिदुत्त्वाचा मुद्दा पुढे करून मुख्यमंत्र्यांना हिंदुत्त्व सांगणे हे दुर्दैवी असल्याचं असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटलंय. ‘मुख्यमंत्र्यांकडून यापद्धतीची अपेक्षा करणं अप्रासंगिक असून असं व्हायला नको’ अशी अपेक्षाही असदुद्दीन ओवैसी यांनी केलीय. सोबतच, त्यांनी राज्यपालांना संविधानाच्या शपथेचीही आठवण करून दिलीय.

‘ज्यांनी संविधानाची शपथ घेतली, त्या राज्यपालांकडून अशी वक्तव्य केली जात आहेत, हे खूपच दुर्दैवी आहे. संविधानाच्या शपथेसाठी ‘हिंदुत्वा’च्या परीक्षेची आवश्यकता नव्हती. आपली कर्तव्य पार पाडण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्वाप्रती प्रतिबद्धता अप्रासंगिक आहे आणि हा मुद्दाच चर्चेत येण्याची आवश्यकता नव्हती’ असं ट्विट असदुद्दीन ओवैसी यांनी केलंय.

दरम्यान, विरोधी पक्ष भाजपकडून (BJP) मंदिरं उघडण्याची मागणी केली जातेय. यासाठी काल भाजपने राज्यभर आंदोलनदेखील केले. भाजपकडून ही मागणी राज्यपालांसमोर पत्राद्वारे मांडली गेली. यानंतर, राज्य सरकार मंदिरं भाविकांसाठी का खुली करत नाहीत? असा सवाल करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या पत्रात ‘हिंदुत्वाची’ गळ घातली. ‘तुम्ही कट्टर हिंदुत्ववादी आहात. तुम्ही हे मान्यही केलंय. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही अयोद्धेलाही गेला होतात. आषाढी एकादशीला पंढरपूरला जात विठ्ठल- रखुमाईची पूजाही केली. मंदिरं बंद ठेवण्यासाठी तुम्हाला दैवी संकेत मिळत आहेत का? की ज्या ‘सेक्युलर’ शब्दाचा तुम्हाला तिरस्कार वाटत होता तो ‘सेक्युलर’ शब्द तुम्ही स्वीकारला आहे’ असे प्रश्न राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात विचारले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER