ओवेसी काँग्रेसला म्हणालेत ‘बॅण्ड-बाजा पार्टी’

हैदराबाद : एमआयएम पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक (West Bengal Assembly Election) लढणार अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) केल्यापासून काँग्रेस (Congress) आणि तृणमूल काँग्रेस एमआयएमवर टीका करत असून तिला भाजपाची (BJP) ‘बी’ टीम म्हणून हिणवत आहेत. या टीकेला उत्तर देताना ओवेसी यांनी काँग्रेसचा उल्लेख ‘बॅण्ड-बाजा पार्टी’ (band-baja party) असा केला!

ओवेसी यांनी ट्विट केले – “पश्चिम बंगालमधील विधनासभा निवडणूक लढवणार असल्याचे आम्ही जाहीर केल्यानंतर, एकेकाळी काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॅण्ड-बाजा पार्टीने आम्हाला भाजपाची बी टीम म्हणणे सुरू केले. ममता बॅनर्जी देखील असेच म्हणत आहेत. मी एकमेव आहे ज्याच्याविषयी ते बोलू शकतात? मी कुणाचाही नाही पण जनतेचा आहे.”

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER