कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग शक्य

Koyna Dam

सातारा : सध्या कोयना धरण (Koyna Dam) शंभर टक्के भरले आहे.105.25 टीएमसी पाणी साठवण (overflow) क्षमता असलेल्या कोयना धरणात 105.14 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणक्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असल्याने कोणत्याही क्षणी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे.

पहिल्यांदा कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून व त्यानंतर गरजेनुसार धरणाचे सहा वक्री दरवाजे उचलून त्यातून पूर्वेकडे कोयना नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, नदीकाठच्या गावांना कोयना सिंचन विभागाकडून सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणांतर्गत विभागात पावसाने उघडीप दिल्याने अंतर्गत नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून प्रतिसेकंद सरासरी 1328 क्युसेक्स पाण्याची आवक होत असल्याने पाणीसाठ्यात संथगतीने वाढ होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER