ट्रम्प दौऱ्यावर असताना दिल्लीत दंगल हे गृहमंत्र्यांचे अपयश; शहांनी राजीनामा द्यावा – सुप्रिया सुळे

Amit Shah - Supriya Sule

पुणे : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौ-यावर आहेत. शाहीनबागचे आंदोलन शमल्यानंतर पुन्हा ईशान्य दिल्लीत सुधारित नागरिकत्व कायद्याचे (सीएए) समर्थक आणि विरोधक यांच्यामध्ये सोमवारी वाद होऊन हिंसाचार झाला होता. यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या हिंसाचाराचे खापर गृहमंत्री अमित शहा यांच्याच डोक्यावर फोडले आहे.

राष्ट्रवादीने सत्तेचा गैरवापर करुन पैसा आणि दहशतीच्या बळावर माळेगाव जिंकले!

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “दिल्लीतील हिंसाचाराची घटना ही धक्कादायक आहे. दिल्लीमध्ये ट्रम्पसाहेबांचा मोठा दौरा सुरू असताना तिथे दंगल होतेच कशी? हे सर्वतोपरी गृह मंत्रालयाचं अपयश आहे. याचं स्पष्टीकरण गृहमंत्री अमित शहा यांनी देशाला द्यावं. गुप्तचर यंत्रणा कुचकामी ठरतेच कशी? जर त्यांना हे जमत नसेल तर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.” असं खासदार सु्प्रिया सुळे पुण्यात पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

विरोधकांना पाच वर्षांसाठी शुभेच्छा
महाविकास आघाडी सरकारविरोधात आज भाजपाचे राज्यस्तरीय धरणे आंदोलन मुंबईतील आझाद मैदानात सुरू आहे. यावरून सुळे म्हणाल्या, “विरोधकांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. ते अतिशय चांगल्या रीतीने विरोधी पक्षाचं काम करीत आहेत. आमचं सरकार हे दडपशाहीचं सरकार नाही. विरोधकांनी आता पाच वर्षे त्यांचं काम चांगल्या पद्धतीनं करावं.” हिंगणघाटबाबत सुळे म्हणाल्या, “आपलं गृह खातं सक्षम आहे. या प्रकरणी मुळाशी जाऊन काम करणाऱ्यांच्या सूचनांचा विचार करून गृह मंत्रालय अशा घटना रोखण्याबाबत पुढे योग्य तो निर्णय घेईल.”