पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत कर्ज घेण्यासाठी २७ लाख फेरीवाल्यांचे अर्ज दाखल

Over 27 lakh street vendors apply for loan under PM scheme

नवी दिल्ली : गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाने बुधवारी सांगितले की, विशेष सूक्ष्म कर्ज योजनेच्या अंतर्गत फेरीवाले  (Street Vendors) आणि हातठेलेवाल्यांकडून १०,००० रुपयांच्या कर्जासाठी २७.३३ लाखांहून (27 Lakh) अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. अधिकृत दिलेल्या माहितीनुसार, एकूण २७,३३,४९७ अर्जांपैकी १४.३४ लाख फेरीवाल्यांचे प्रधानमंत्री स्वनिधी योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले आहेत.

यापैकी आतापर्यंत ७.८८ लाख कर्ज वितरित करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस साथीच्या वेळी ज्या फेरीवाल्यांनी आपले काम सोडले व घरी बसून होते ते सर्व या योजनेत कर्ज घेण्यास पात्र आहेत. या योजनेंतर्गत कर्ज घेण्यास सुलभ करण्यात आले आहे. कोणत्याही सामान्य सेवा केंद्र किंवा महानगरपालिका कार्यालयातून ऑनलाईन अर्ज करता येतात किंवा हा अर्ज  बँकेतून घेता येईल.

गृहनिर्माण व नागरी व्यवहार सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी ट्विटरवर लिहिले की, पीएम स्वनिधी योजना पुढे सरकत आहे. या अंतर्गत २७ लाखांहून अधिक अर्ज प्राप्त झाले. आतापर्यंत १४ लाखांहून अधिक अर्ज मंजूर झाले आहेत. त्यापैकी आतापर्यंत सुमारे ८ लाख कर्जे वितरित केली गेली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER