
नवी दिल्ली : मजूर – कामगाराना त्यांच्या राज्यात पोहचवण्यासाठी राज्ये मागतील तितक्या गाड्या (विशेष श्रमिक) देईन. मात्र गाडीची मागणी केल्यानंरही राज्यांनी प्रवासी दिले नाही त्यामुळे २५० गाड्या वापरण्यात आल्या नाहीत, अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की – एकट्या महाराष्ट्रात १०० पेक्षा जास्त गाडयांना राज्याकडून प्रवासी मिळाले नाहीत; तरीही आम्ही तक्रार केली नाही. आम्ही तयार ठेवलेल्या १४५ गाड्या महाराष्ट्राने वापरल्या नाहीत. या गाड्या मजुरांना त्यांच्या राज्यात नेण्यासाठी अन्यत्र वापरता आल्या असत्या. एकदा त्यांनी २० हजार लोकांना बांद्रा येथे आणले. आम्ही बांद्रा येथे गाडीची व्यवस्था केली पण यादीप्रमाणे प्रवासी आले नाहीत.
विशेष श्रमिक गाड्या निर्धारित ठिकाणी उशिरा पोहतात, या आक्षेपाला उत्तर देताना गोयल म्हणालेत की – १ मे रोजी आम्ही विशेष श्रमिक गाड्या सुरू केल्यात. आधी या गाड्या निर्धारित वेळेत किवा कधी – कधी वेळेच्या आधी निर्धारित ठिकाणी पोहचत होत्या. मात्र गाड्यांची गर्दी झाल्यानंतर गाडयांना विलंब होणे सुरू झाले.
आकडेवारीनुसार १ मे पासून ३७४० विशेष श्रमिक गाड्या सोडण्यात आल्या त्यातील ४० टक्के गाड्या उशिरा पोहल्यात.
संबंधित राज्ये मजुरांना राज्यात परत घेण्यास तयार नव्हती त्यामुळे मजूर स्टेशनवर यायचे पण त्यांना प्रवास करता येत नव्हता. मला फोनवरून अशी माहिती मिळाली की पूर्वोत्तर भारतातील उत्तरप्रदेश, बिहार यासारखी तीन – चार राज्ये स्थलांतरितांना परत घेण्यास तयार नाहीत, असे ते म्हणालेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला