दिल्लीत परराज्यातील लोकांचा गोंधळ? अरविंद केजरीवाल यांना शंका

Arvind Kejriwal

नवी दिल्ली : लागोपाठ तिसऱ्या दिवशी नवी दिल्लीत सीएए आणि एनआरसीवरून आंदोलन सुरूच आहे. सीएए-एनआरसी समर्थक आणि विरोधक हे समोरासमोर आल्याने हा हिंसाचार सुरू आहे. दोन्ही गटांनी यावेळी एकमेकांवर दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान, दिल्लीतील हिंसाचाराच्या या पृष्ठभूमीवर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत परराज्यातील लोक येऊन गोंधळ घालत असल्याची शंका व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज मंगळवारी पत्रपरिषद घेतली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही शंका व्यक्त केली. दिल्लीच्या सर्व सीमा बंद करा, अशी मागणीही यावेळी त्यांनी केली. परराज्यातून लोक दिल्लीत येत असल्याचे दिल्लीच्या सीमा भागातील आमदारांनी म्हटले आहे, अशी माहिती यावेळी केजरीवाल यांनी दिली. खबरदारी म्हणून, काहींना अटक करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.

दिल्लीत सीएएवरून हिंसाचार : जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचे कारस्थान-गृहराज्यमंत्री