दुकानाबाहेरच्या “शटर बंद असेल तर कॉल करा, आम्ही आत्म्याप्रमाणे इथेच भटकत आहोत”ला पोलिसांचे भन्नाट उत्तर

Lockdown - Shop Shutter

कोरोनाच्या (Corona) निर्बंधाच्या काळात अनेक दुकानदार, दुकान बंद ठेवून सामान विकण्यासाठी शक्कल लढवत आहेत. एका दुकानदाराने असाच लिहिलेल्या सांकेतिक संदेशचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.

या बंद दुकानाबाहेर सूचना लिहिली आहे – जर माझ्या दुकानाचे शटर बंद असेल तर आम्हाला संपर्क करा. आम्ही आत्म्याप्रमाणे इथेच कुठेतरी भटकत आहोत. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल होताच पोलीस अधिकारी दीपांशु काबरा यांनी शेअर केला. सोबत गंमतीदार रिप्लाय देत म्हटले – या भटकती आत्म्याची लवकरच पोलिसांची भेट होईल!

हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. युजर्स एकमेकांना हा फोटो शेअर करत आहेत. सोबत मजेदार कमेंट्सही करत आहेत. या फोटोला आतापर्यंत २ हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले – आता त्याचा आत्मा जेलमध्ये भटकेल. तर दुसऱ्याने या आत्म्याला शांती लाभो असे म्हटले आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button