खासदार संजय पाटील समर्थकांचे आऊटगोईंग

Sanjay Patil

सांगली : तासगाव तालुक्यातील खासदार संजय पाटील (Sanjay Patil) समर्थकांचे आऊटगोईंग सुरू झाले आहे. एक-एक करुन कार्यकर्ते खासदार संजय पाटील यांना सोडून चालले आहेत. नुकतेच तीन कट्टर समर्थकांनी मुंबईत शिवबंधन बांधले. प्रवेशाचा हा कार्यक्रम होईतोपर्यंत तासगाव पूर्व भागातही खासदार गटाला मोठे खिंडार पडले आहे. पुन्हा एकदा तासगाव तालुक्यात खा. पाटील आणि आमदार सुमनताई पाटील गटात राजकीय इर्षा वाढणार आहे.

सावळज (ता. तासगाव) येथील खासदार समर्थक माजी सरपंच हेमंत पाटील आणि माजी उपसरपंच अनिल थोरात यांच्यासह मोठा गट अंजनी येथे आमदार सुमन पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. सावळज ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. २०१५ च्या निवडणूकीत खासदार पाटील यांनी आमदार सुमन पाटील यांच्याकडून सत्ता काढून घेतली होती. आता या निवडणुकीत खासदार संजय पाटील व आमदार सुमन पाटील गट एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. ही निवडणूक काट्याची होण्याची चिन्हे दिसत आहेत. या परिस्थितीत समर्थक बाहेर पडू लागल्याने खासदार संजय पाटील यांची चिंता वाढू लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER