सर्दी-खोकल्यासह साथीच्या आजार : कोरोनाची धास्ती

Outbreaks appear to be exacerbated during colds and coughs

सांगली : गेल्या चार दिवसांपासून वातावरणात कमालीचा गारठा वाढला आहे. किमान १६ तर कमाला २७ अंश सेल्सियस आहे. आठवड्यात सरासरी आठ अंशाने पारा उतरला आहे. परिणामी हवेत आर्दता वाढली आहे. सकाळी धुके तर दिवसभर थंड वातावरण असते. रात्री थंडीचा जोर वाढतो. बदलेल्या वातावरणामुळे घराघरात अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप (colds and coughs,) आदींचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. येत्या काळात कोरोना पुन्हा उचल खाण्याची भिती असल्याने अनेकांनी धशस्प धास्ती घेतली आहे. ऋतुसंक्रमणामुळे होणाऱ्या या आजारांवर वेळीच उपचार करण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.

मे-जून, सप्टेंबर-ऑक्टोबर, जानेवारी-फेब्रुवारी हा कालावध ऋुतूसंक्रमणाचा असतो. वातावरणात अचानक होणाऱ्या बदलामुळे अंगदुखी, सर्दी-खोकला ताप आदी रुग्ण संख्या वाढते. सध्या पावसाळा संपूण हवेत गारठा वाढला आहे. तसेच नदी पात्रात आजूबाजूचे पाणी आल्याने दुषीत पाण्यामुळे जलजन्य आजाराचाही धोका आहे. गॅस्ट्रो, डेंग्यू, मलेरियाची रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.

वातावरणातील बदलामुळे विषाणू संसर्ग वाढत आहे. मास्क वापरणे, योग्य सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. गरम पाणी पिणे, कोमठ पाण्यात मिठ टाकून गुळण्या आदी प्राथमिक उपचार करावेत. त्याजोडीला वैद्यकीय तपासणी आणि औषधउपचार करुन घ्यावेत असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER