अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, राज्य सरकारचा आदेश

मुंबई :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १५ दिवसांच्या संचारबंदी लावण्यात आली आहे. पुढील १५ दिवस म्हणजे १ मे पर्यंत राज्यात कलम १४४ लागू असणार आहे. त्यामुळे विनाकारण कुणालाही बाहेर फिरता येणार नाही. जर विनाकारण घराबाहेर पडल्यास कारवाईचीही शक्यता नाकारता येत नाही.

काय सुरु राहणार?

 • राज्यात १४४ कलम चालू, पुढचे १५ दिवस संचारबंदी.
 • अनावश्यक बाहेर फिरणं टाळणे.
 • घराबाहेर विनाकारण बाहेर पडू नये.
 • आवश्यक सेवा वगळून इतर सेवा बंद राहतील.
 • सकाळी ७ ते रात्री ८ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.
 • लोकल, बस अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु राहतील.
 • जनावराचे रुग्णालय सुरु राहतील.
 • पावसाळी पूर्व कामं सर्व सुरु राहतील.
 • अधिस्विकृती पत्रकारांना मुभा राहिल.
 • हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील टेक अवे सुरुच राहतील.
 • रस्त्यावरच्या ठेले वाल्यांनाही टेक अवेची घोषणा.

काय बंद राहणार?

 • प्रार्थना स्थळं, शाळा आणि कॉलेज, खाजगी कोचिंग क्लासेस, सलून, स्पा आणि ब्युटी पार्लर १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत बंद
 • रेस्टॉरंट्समध्ये बसून खाता येणार नाही.
 • अत्यावश्यक सेवा वगळता इतर कार्यालयं बंद
 • कामाशिवाय फिरण्यास बंदी
 • सर्व सार्वजनिक ठिकाणं बंद
 • धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक सभांवर बंदी

Chcek PDF 1.-Direction for Containment and Management of Covid-19 Epidemic Order No. 12COVID-192021 dt. 14042021

Check PDF 2.-Brk the chain 14th April

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button