दिल्लीतील दंगलीमागे बाहेरच्या लोकांचा हात : केजरीवाल

Arvind Kejriwal

नवी दिल्ली : दिल्लीतील हिंसाचारामागे दिल्ली बाहेरच्या लोकांचा हात असल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी विधानसपरिषदेत केली. दिल्लीतील परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने लष्कराला पाचारण करण्यात यावे असेही ते म्हणाले.

अनुराग ठाकुर, कपिल मिश्रा व परवेश वर्मा यांच्यावर प्राथमिकी दाखल होण्याची शक्यता

दिल्लीतील हिंदू आणि मुस्लिमांना आपसांत भांडण व हिंसा नको आहे. मात्र काही असमाजिक, राजकीय आणि बाहेरच्या लोकांद्वारे हिंसाचार घडवून आणण्यात आला आहे. एक सामान्य माणूस हे सर्व करु शकत नसल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

या हिंसाचारात शहीद झालेले दिल्लीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी घोषणाही यावेळी केजरीवाल यांनी केली. दिल्लीची ओळख दंग्यांनी नव्हे तर चांगले शिक्षण आणि आरोग्यानेच शक्य असल्याचे ते म्हणाले.