५४ लाखांपैकी आतापर्यंत २३ लाखच लसी का टोचल्या? जावडेकरांचा महाराष्ट्र सरकारला सवाल

Prakash Javadekar - Coronavirus Vaccine - CM Uddhav Thackeray

नवी दिल्ली : कोरोना लसीच्या (Coronavirus Vaccine) वाटपावरून केंद्र सरकार (Central Government) आणि महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) कलगीतुरा रंगला आहे. महाराष्ट्राला दर आठवड्याला लसीचे २० लाख डोस देण्याची मागणी महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेच्या (Shiv Sena) खासदारांनीही केंद्राकडे केली आहे. त्यावर, महाराष्ट्राला ५४ लाख कोरोनाच्या लसी देण्यात आल्या. मग आतापर्यंत केवळ २३ लाख लसीच का देण्यात आल्या? असा प्रश्न केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी महाराष्ट्र सरकारला केला आहे. त्यांनी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केला आहे.

कोरोना लस वाटपाच्या मुद्द्यावरून जावडेकर यांनी ट्विट करत महाराष्ट्र सरकारलाच उलट प्रश्न केला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत केवळ २३ लाख लसी टोचण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने ५४ लाख लसी देऊनही अत्यंत कमी लसीकरण करण्यात आलं आहे. राज्यात केवळ ५६ टक्के लसीकरण करण्यात आलं आहे, असं जावडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER