
चंद्रपूर : मंत्री धनंजय मुंडे (Dhnanjay Munde) यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने अखेर आपली तक्रार मागे घेतली. मात्र अश्या स्वरूपाचे गंभीर आरोप लावल्यानंतर तक्रार मागे घेण्याचे कारण काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरून मुंडेंवर निशाणा साधणारे आता पेचात पडले आहेत. यासंदर्भात भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली. तक्रारकर्त्यावर दबाव येऊ नये यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा आवश्यक असतो, सेटिंग-फिटिंग हा गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न झाला का? आता त्या महिलेवर खोटी तक्रार केल्याची कारवाई करा, अशी मागणी भाजप नेते मुनगंटीवार यांनी केली आहे.
तक्रारकर्त्यावर दबाव येऊ नये यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा घेणे आवश्यकअसते. हा सेटिंग-फिटिंगने गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही. आता त्या महिलेवर खोटी तक्रार केल्याची कारवाई करा, असे मत त्यांनी व्यक्त केले. भाजप नेते दबावाखाली तक्रारकर्ता प्रभावित होऊ नये यासाठी भाजपा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत होती. आणि आमची भीती आणि शंका खरी ठरली, असेही मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, णू शर्मा यांनी तक्रार मागे घेण्याचं कारण सांगितलं आहे. मी धनंजय मुंडे यांच्यावर लग्नाचे वचन आणि बलात्काराचा आरोप केला होता, या संदर्भात माझे हे निवेदन आहे. मला हे स्पष्ट करायचे आहे, की माझी बहीण आणि धनंजय मुंडे यांच्यात काही काळापासून तणाव निर्माण झाला असून कोर्टात खटला सुरू झाल्याने मी मानसिक तणावाखाली होते. मात्र, विरोधी पक्ष त्यांच्याविरूद्ध (मुंडे) जाताना पाहून मला वाटले की मी मोठ्या राजकीय षडयंत्राचा बळी होत आहे. काही लोक माझ्या खांद्यावर बंदुका ठेऊन चालवत आहेत आणि हे सर्व चुकीचे आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला