आमचे पवारसाहेब महाराष्ट्राची शान ! जे होईल ते त्यांच्या इच्छेनुसार- नवनीत राणा

Navneet Rana & Sharad Pawar

अमरावती :- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यूपीएचे अध्यक्ष होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. त्यातच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आमचे पवारसाहेब महाराष्ट्राची शान आहेत, जे होईल ते पवारांच्या इच्छेनुसार होईल, असे नवनीत राणा म्हणाल्या आहेत.

“आमचे पवारसाहेब महाराष्ट्राची शान आहेत. महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट इथून तिथे गेली असेल, तर ते फक्त शरद पवारच करू शकतात. एनिथिंग इज पॉसिबल, ते सगळ्यात सिनिअर नेते आहेत. आणि राजकारणाच्या क्षेत्रात कोणी त्यांचा हातही धरू शकत नाही. त्यामुळे जे होईल ते शरद पवारांच्या इच्छेनुसार होईल.” असं मत नवनीत राणा यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्रातला कित्ता दिल्लीतही गिरवला जावा आणि केंद्रामधलं सरकार सत्तेच्या खाली खेचावं, हे सगळं प्लॅनिंग पवारांकडे देण्याचं नियोजन सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचं असल्याचं बोललं गेलं. मात्र “या सगळ्या चर्चा आहेत. यूपीएच्या अध्यक्षपदाच्या संदर्भामध्ये कोणतंही तथ्य नाही” असं स्वतः शरद पवार म्हणाले आहेत.

ही बातमी पण वाचा : शरद पवार UPA ला फायदा करुन देतील, पण …- पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER