शिवसेनेला हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही – संजय राऊत

Sanjay Raut

मुंबई :- शिवसेनेला (Shiv Sena) हिंदुत्व शिकवू नये, आमचं हिंदुत्व राजकीय नाही. भाजपावाल्यांनी (BJP) संघाकडून हिंदुत्व शिकावं, असा खरमरीत टोला शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला लगावला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली असता त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला.

शिवसेनेची चळवळ मराठी माणसाची जोडली आहे. आम्ही राजकारणात पदं मिळावी म्हणून आलो नाही, ही चळवळ वाढली पाहिजे, महाराष्ट्राच्या गावागावात पोहचली पाहिजे यासाठी आम्ही काम केले. शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये, आजही आक्रमकपणे आम्ही हिंदुत्व मांडतो, आमचं राजकीय हिंदुत्व नाही हे सगळ्यांना माहीत आहे. ३० वर्षांपूर्वी हिंदुत्वाचं वारं वाहू लागलं होतं, तेव्हा इराणमध्ये खोमेनी यांचा उदय झाला होता. तेव्हा बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) म्हणाले होते, मला हिंदूंचा खोमेनी व्हायचं नाही आहे. माझं हिंदुत्व आहे ते वेगळं हिंदुत्व आहे. माझं हिंदुत्व फक्त घंटा वाजवणारं हिंदुत्व नाही. घंटा वाजवली म्हणजे हिंदुत्व, शेंडी आणि जानवं घातलं म्हणजे हिंदुत्व तर तसं नाही. राजकारणासाठी शिवसेनेनं हिंदुत्वाचा वापर केला, असं मला वाटत नाही, असंही संजय राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

जर कोणी करत असेल तर आम्ही त्यांना थांबवलं नाही. संघाकडून आम्हाला हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. आम्ही हिंदू आहोतच. पण ज्या पद्धतीच्या हिंदुत्वाचा आधार दिल्लीतील राज्यकर्ते आणि महाराष्ट्रातला विरोधी पक्ष घेत आहेत. त्यांनी सरसंघचालकांकडूनही काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आरएसएस असेल, विश्व हिंदू परिषद असेल प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं काही विषय पुढे घेऊन गेले आहेत. आम्ही कधीही अकारण एकमेकांवर टीकाटिपण्णी केली नाही. कारण शेवटी हिंदुत्वाचा विचार पुढे जाणं महत्त्वाचं असल्याचंही संजय राऊतांनी अधोरेखित केले आहे.

बाळासाहेब ठाकरे कसे निर्माण झाले हे नव्या पिढीला कळावं म्हणून ठाकरे सिनेमा काढला, सत्ता येण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्यांच्याविषयी शिवसैनिकांच्या मनात कटुता नाही, आता सगळेच मूळ शिवसैनिक आहेत. बाळासाहेब ठाकरे नेहमी विरोधकांचे ऐकायचे, त्यांच्यासोबत चर्चा करायचे, हीच परंपरा महाराष्ट्राची आहे, काँग्रेस असो शरद पवार असो सगळ्यांनी ही परंपरा कायम राखली आहे, संवाद राखणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे, राजकारणासाठी आम्ही हिंदुत्वाचा वापर केला नाही, सगळ्यांना बरोबर घेऊन चाललो असं संजय राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : शरद पवार हे लोकनेते, त्यांचा सल्ला घेतल्यास चंद्रकांतदादांना वाईट वाटू नये – संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER