आपला देश षडयंत्र रचणाऱ्यांना योग्य उत्तर देतोय; मोदींचा विरोधकांना टोला

PM Narendra Modi

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मन की बात’मधून आज देशवासीयांशी संवाद साधला. योगायोगाने केंद्रातील भाजपच्या (BJP) सरकारला सात वर्षे  पूर्ण झाल्याने हाच धागा पकडून मोदी यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले. आता आपला देश दुसऱ्या देशांच्या विचारांवर चालत नाही. कुणाच्याही दबावात येत नाही. आपण आपलेच संकल्प घेऊन पुढे चालले आहोत. आता भारत आपल्याविरोधात षडयंत्र करणाऱ्यांना योग्य उत्तर देत आहे. त्यामुळे आत्मविश्वास वाढला आहे. हे पाहून अभिमानही वाटत आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टोला लगावला.

गेल्या सात वर्षांत जे काही आपण कमावलं आहे, ते देशाच्या प्रत्येक नागरिकाच्या मेहनतीचे फळ आहे. या सात वर्षांत आपण राष्ट्रगौरवाचे हे क्षण एकत्र मिळून अनुभवले आहेत. आपण आपल्याच विचाराने पुढे जात आहोत. कुणाच्याही दबावात नाही. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर आपण तडजोड करत नाही. जेव्हा आपल्या लष्कराची ताकद वाढते तेव्हा आपण योग्य मार्गाने जात आहोत, असं वाटतं. देशाच्या कानाकोपऱ्यातून मला देशवासीयांचे संदेश आणि पत्रं येत असतात. ७० वर्षांनंतर त्यांच्या गावात वीज पोहचल्याबद्दल हे लोक आभार व्यक्त करत आहेत. आमच्या गावात पक्के रस्ते झाले. त्यामुळे आम्ही शहराशी जोडले गेलोत, असं अनेक लोक सांगत आहेत, असं त्यांनी सांगितलं.

या सात वर्षांत देशाने डिजिटल व्यवहार सुरू केले आहेत. जगाला नवी दिशा दाखवण्याचं काम केलं आहे. आज कोणत्याही ठिकाणी तुम्ही चुटकीसरशी डिजिटल पेमेंट करू शकता. कोरोनाच्या (Corona) संकटात त्याचा फायदाच झाला आहे. आज स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागृतता निर्माण झाली आहे. आपण रस्ते बनविण्याचा धडाकाही लावला आहे. या सात वर्षांत  अनेक जुने वादही संपुष्टात आले आहेत. त्यामुळे शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे. पूर्वेपासून ते काश्मीरपर्यंत शांततेचं वातावरण निर्माण झालं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button