जिओ कंपनीमुळे आमचा धंदा धोक्यात; आता मुंबईतील केबलचालक कृष्णकुंजवर

Raj Thackeray

मुंबई : आजपर्यंत राज्यातील अनेक जण आपले गा-हाणे घेऊन राजदरबारी गेले आहेत आणि त्यांच्या तक्रारींचे निरसनही झाले आहे. आता मुंबईतील केबलचालक आपली गा-हाणी घेऊन कृष्णकुंजवर राज ठाकरेंच्या भेटीसाठी जाणार आहेत.

जिओ कंपनीच्या आक्रमक धोरणामुळे आमचा धंदा धोक्यात आल्याचे केवलचालकांची तक्रार आहे. राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर ते दाखल झाले आहेत.

जिओ कंपनीकडून (Jio) विनापरवाना कनेक्शन देण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी झाडे, रस्ते आणि वीजेच्या खांबांवरुनही केबल टाकल्या जात आहेत. जिओ कंपनीमुळे बाजारपेठेत निर्माण झालेल्या स्पर्धेचा सामना करण्यासाठी इन मुंबई, हॅथवे, डीजे आणि सिटी केबल या कंपन्या एकत्र आल्या आहेत. मात्र, जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात आल्याचे केबल चालकांचे म्हणणे आहे. (Mumbai cable tv operators meet MNS chief Raj Thackeray)
त्यामुळे आता राज ठाकरे मुंबईतील केबलचालकांची कशाप्रकारे मदत करणार, हे पाहावे लागेल.

काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी बेस्टच्या हंगामी कर्मचाऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी सेवेत सामावून घेण्यात आले होते. हे कर्मचारी सोमवारी राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर येणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER