‘आमचा राग अजितदादांवर नव्हे, तर दगाबाज शिवसेनवर’ – चंद्रकांत पाटील

Uddhav Thackeray & Chandrakant Patil

पुणे :- राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामध्ये शाब्दीक वाद रंगला आहे. ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र बाहेर कसे आले, असे पाटील म्हणाले होते. यावर बोलताना अजित पवार म्हणाले होते की, ‘जी गोष्ट झाली आहे, तिला चौदा महिने झाले. मागच्या गोष्टी उकरून काढत आहेत. ज्यांना काम नाही ते नको त्या गोष्टी बोलतात. मात्र आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी आमचा राग अजितदादांवर नव्हे तर दगा देणाऱ्या शिवसेनेवर (Shivsena) असल्याचे म्हटले आहे.

पाटील म्हणाले की, अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. त्यांचे आणि माझे वैयक्तिक वाद नाहीत. पण, ते जेव्हा माझ्या पक्षाबद्दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत बोलतात, आमच्या संस्थांबाबत बोलतात तेव्हा त्यांना प्रत्युत्तर देणे भाग भाग आहे. ते भाजपबद्दल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याबाबत बोलले तर मी गप्प बसणार नाही. असेही पाटील म्हणाले.

सरकार पडले म्हणून अजित पवार यांच्यावर तुमचा राग आहे का असा प्रश्ना पाटील यांना विचारला असता ते म्हणाले की, माझा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा राग सरकार पडले म्हणून अजित पवारांवर नाही. आमचा राग शिवसेनेने दगा दिला, त्यामुळे दगाबाज असलेल्या शिवसेनेवर आहे.

ही बातमी पण वाचा : नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत गेल्यावर तरी खरं बोलावं : चंद्रकांत पाटील 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button