‘…अन्यथा भस्मसात व्हाल’; मनसेकडून प्रबोधनकार, बाळासाहेब आणि राज ठाकरेंच्या भाषणाची क्लिप शेअर

Raj Thackeray - Balasaheb Thackeray - Maharashtra Today
Raj Thackeray - Balasaheb Thackeray - Maharashtra Today

मुंबई : आज महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओत प्रबोधनकार ठाकरे, शिवसेनाप्रमुख (Shivsena) बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) आणि पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भाषणांची ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करण्यात आली आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राबद्दल द्वेष बाळगणाऱ्यांना कडकडीचा इशारा देण्यात आला आहे. सामर्थ्यवंत महाराष्ट्राचा, ज्वलंत ‘ठाकरी’ वारसा!, असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आले आहे.

व्हिडिओमध्ये सर्वात आधी प्रबोधनकार ठाकरे यांची भाषणाची क्लिप टाकण्यात आली आहे. यात प्रबोधनकार म्हणतात, महाराष्ट्र हा काही लेच्यापेच्यांचा देश नाही. ही वाघांची औलाद आहे. या वाघाला कोणी डिवचलं तर याचे परिणाम काय होतात याचे इतिहासात दाखले आहे. भविष्यात पाहायचे असतील तर बघायला मिळेल.

दुसऱ्या ऑडिओ क्लिपमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची संभाषण आहे. यात बाळासाहेब म्हणतात की, ज्या ज्या वेळी या देशावर गंडांतरं आलेली आहे त्या त्या वेळेला आपले शिवराय नसते तर आज सगळ्यांची सुंता झाली असती. तर शेवटच्या ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे यांचे भाषण ऐकवण्यात आले आहे. हा लढवय्या महाराष्ट्र आहे, जे जे काही मिळवलं ते लढवून मिळवलं आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करु नका, हा तिसरा नेत्र जर शिवरायांनी उघडला तर सर्व भस्मसात व्हाल, असे राज ठाकरे म्हणाले आहेत. आणि सरत शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा फडकतांना दाखवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button