…अन्यथा कायदा हातात घेऊ : शिवसेनेचा इशारा

Daulat Desai - Shiv Sena

कोल्हापूर : तुम्ही कोल्हापूरकरांची (Kolhapur) सेवा केली आहे, तोच आदर्श अन्य जिल्ह्यांसाठी यापुढे कायम ठेवा. कोरोना (Corona) महामारीच्या काळात शासनाने कायदा केला आहे, त्याचे पालन करा, अन्यथा नाइलाजास्तव आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशारा शिवसेनेने(Shiv Sena) दिला.

जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील रुग्णालयांची जिल्हा प्रशासनाने बैठक घेतली. यावेळी रुग्ण नाकारू नका, त्यांच्यावर प्रथम उपचार करा. त्यांना योजनेचा लाभ द्या, अवास्तव बिल आकारणी करू नका; अन्यथा मी स्वत: गुन्हा दाखल करेन, असा इशारा जिल्हाधिकारी दौलत देसाई(Daulat Desai) यांनीही दिला.

जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, महात्मा जोतीराव फुले जनआरोग्य योजनेत समावेश असलेल्या रुग्णालयांनी कोरोना रुग्णांना दाखल करून त्यांना योजनेचा लाभ द्यावा. दाखल करून घेण्यास अथवा त्यांच्यावर उपचार करण्यास हलगर्जीपणा करू नये. जादा बिल आकारल्यास त्याची पडताळणी केली जाईल. त्यात दोषी आढळणार्‍यांवर कारवाई केली जाईल. प्रसंगी योजनेतून काढून टाकून त्यांची नोंदणी रद्द करू.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER