अन्यथा एमपीएससी परीक्षा केंद्र बंद पाडू : खा. संभाजीराजे

Sambhaji Raje

मुंबई : एमपीएससीच्या परीक्षा (MPSC) 11 तारखेला जर घेतल्या तर मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) वतीने परीक्षा केंद्र बंद पाडू, असा इशारा खासदार संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी दिला. राज्य सरकारने मराठा समाजाला (Maratha Community) नोकरीत व शिक्षणात आरक्षण द्यावे, या अनुषंगाने आज नवी मुंबईतील माथाडी भवनमध्ये या आंदोलनाची रूपरेषा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ते बोलत होते. ही फक्त माझी भूमिका नसून संपूर्ण समाजाची भूमिका असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. संभाजीराजे म्हणाले, माथाडी भवन येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठकीत दोन दिवसात सरकारने मराठा आरक्षणावर निर्णय घ्यावा. अन्यथा, पुढे काही होईल, त्याला सरकार जबाबदार असेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER