…नाहीतर शेतकऱ्यांच्या घरीदेखील धाडी टाकतील ; उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला टोला

CM Uddhav Thackeray - PM Narendra Modi

मुंबई :- आपला शेतकरी शेतात मरमर मरुन सोनं पिकवतो. सोनं म्हणजे अन्न, नाहीतर त्याच्या घरावरही धाडी पडतील, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारला लगावला आहे . केंद्र सरकार (Central Government) शेतकऱ्यांचे हक्क हिरावून बाहेरुन कांदा, साखर आणत आहे. हा कुठला कारभार आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला .

महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

भाजपचं मागील वर्ष सरकार कधी पडतंय आणि कधी पडणार याचे मुहुर्त काढत बसण्यात गेले आहेत. त्यामुळे सरकारने काय काय कामं केलीत हे त्यांनी पाहिलंच नसेल. सरकारने मागील वर्षभरात काय कामं केलीत याची पुस्तिका नुकतीच महाराष्ट्राच्या जनतेसमोर ठेवली. जनतेत कुठंही सरकारबद्दल नाराजी किंवा असमाधान असल्याचा सूर नाही. विरोधी पक्षांच्या नावातच विरोधी आहे त्यामुळे त्यांना विरोधी या शब्दाला जागावं लागतं. त्यामुळे ते जे काही म्हणताय ते त्यांच्यापुरतं बरोबर आहे,” असंही मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

ही बातमी पण वाचा : भाजप नेत्यांचे चेहरे पडलेले, अजित पवारांचा टोला

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी हे डावे आहेत, अतिरेकी आहेत, पाकिस्तानी-चिनी आहेत की आणखी कुठून आले आहेत हे भाजपच्या सर्व नेत्यांनी एकदा ठरवावं. जर शोध लागत असेल तर त्यांची फेरयंत्रणा फार प्रभावी मानावी लागेल. आपल्याच अन्नदात्यावर अन्याय करताना त्याला तुम्ही देशद्रोही आणि अतिरेकी ठरवणं हे आपल्या संस्कृतीत बसत नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले (Uddhav Thackeray slams Modi Government).

न्याय हक्कासाठी रस्त्यावर अन्नदाता येत असेल, तर त्याच्याशी नीट जावून बोलण्याऐवजी त्याला देशद्रोही, अतिरेकी, चिनी, पाकिस्तानी म्हणायचे. पाकिस्तानमधून कांदा आणणारे तुम्हीच, आता पाकिस्तानमधून शेतकरीदेखील आणायला लागले.

आपल्या शेतकऱ्यांना पाकिस्तानचं सर्टिफिकेट द्यायचं? असाच जर कारभार चालणार असेल तर हा तुघलकी कारभार सहन करणार नाही, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

दरम्यान या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), परिवहव मंत्री अनिल परब (Anil Parab), महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यासह आणखी काही नेते उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER