अन्यथा मुंबईत पूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय राहणार नाही, पालकमंत्र्याचे संकेत

Aslam Shaikh - Mumbai Lockdown

मुंबई : राज्यात वाढत असलेल्या कोरोना (Corona) रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यभरात १५ दिवस संचारबंदी करण्यात आली आहे. मात्र असे असले तरीही मुंबईत लोक गर्दी करताना दिसून येत आहेत. लोक भाजी बाजारात गर्दी करताना दिसत आहे. त्यामुळे ती मार्केट एक, दोन दिवसांत बंद करण्याच्या सूचना पालिका आयुक्तांना दिल्या आहेत, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी दिली. शासनातर्फे संबंधित नियमावली जारी करण्यात आली आहे. मात्र अनेकजण पोलिसांना खोटी माहिती देऊन रस्त्यावर फिरत आहे. त्यामुळेच पोलिसांनी आता कलर कोड लावण्याचे आदेश दिले आहे.

नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा पूर्ण लॉकडाऊनशिवाय (Lockdown) पर्याय राहणार नाही. रेल्वेकडूनही एक दोन दिवसात प्रवाशांसाठी काही गाईडलाईन्स काढण्यात येण्याची शक्यता आहे. वारंवार सरकार नियमांचे पालन करण्याचे आवाहन करत आहे. मात्र नागरिक ऐकत नाहीत, असंही मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणालेत.

दरम्यान, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरून अत्यंत परखडपणे त्यांचं मत मांडलं आहे. गेल्यावर्षी २७ मुस्लीम बांधव मरकजहून परतल्यानंतर कोरोनाचा प्रसार झाला होता. त्याचप्रकारे आता कुंभमेळ्यातून परतणारे भाविक इतरांना कोरोनाचा प्रसाद वाटत फिरतील असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. प्रत्येक राज्यावर याचा परिणाम होणार आहे. त्यामुळं पंतप्रधानांनी केलंलं ट्वीट योग्य आहे. नक्कीच कुंभमेळा बंद व्हायला हवा पण आता उशीर झाला आहे. आता संसंर्ग रोखायचा असेल तर, परतणारे भाविक ज्या राज्यांत जातील तिथं त्यांना स्वखर्चानं क्वारंटाईन करायला लावावं असंही पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button