…अन्यथा महाराष्ट्रात राजकारणाचा अधिकार नाही : संजय राऊतांची भाजपवर टीका

Devendra Fadnavis - Sanjay Raut

मुंबई : एकीकडे देशात कोरोनाचे संकट आहे. तर दुसरीकडे केंद्र सरकार प्रशासनाला हाताशी धरून भाजपची (BJP) सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये राजकारण करत आहे. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. राज्यातील विरोधी पक्षाने याचा सर्वप्रथम विरोध केला पाहिजे. परंतु, त्यांना केंद्र सरकारची (Modi govt) ही कृती महाराष्ट्राचा अपमान वाटत नसेल तर विरोधकांना महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार उरणार नाही, असे मत शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केले.

ते सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर पुन्हा एकदा टीकेची तोफ डागली. भाजपचे मुख्यमंत्री असलेल्या राज्यांमध्ये कोरोना पळालेला आहे. तर सरकार नसलेल्या राज्यांमध्ये कोरोना आहे, अशाप्रकारे केंद्र सरकार वागत आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ आणि पंजाब ही राज्ये कोरोना हाताळणीत अपयशी ठरली असे केंद्र सरकारेच म्हणणे आहे. मात्र, हे त्या राज्यांचे नव्हे तर मोदी सरकारचे अपयश आहे. कारण, ही राज्यं पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करत होती. त्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नसेल तर हे त्या राज्यांचे नव्हे तर केंद्र सरकारचे अपयश आहे, असे संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button