अन्यथा 5 डिसेंबरला कराड येथे खरा रणसंग्राम : राजू शेट्टी

Raju Shetti

सातारा : साखर कारखाने सुरू असतानाही शेतकऱ्याला एक रकमी एफआरपी रक्कम दिली गेली नाही. कोल्हापूर (Kolhapur), सांगली (Sangli) जिल्ह्यातील 55 साखर कारखान्यांनीही रक्कम दिली असताना सातारा जिल्ह्यातील अवघ्या एका साखर कारखान्याने ती मान्य केली आणि दिली आहे. याबाबत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी याकडे दुर्लक्ष केले असून सरकारने याबाबत त्वरित विचार करावा अन्यथा 5 डिसेंबरला कराड येथे खरा रणसंग्राम होईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी साखर कारखानदार व सहकारमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सातारा (Satara) ते कराड गांधी मार्गाने आत्मक्लेश मोर्चा काढण्याचे ठरवले होते. मात्र, जिल्हा प्रशासन आणि पोलिस यांनी विनंती केली असल्याने हे आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनापूर्वी शेट्टी यांनी पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पायी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राजू शेळके, विलास काळे यांच्यासह पदाधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER