अन्यथा पावसाळी अधिवेशन होऊ देणार नाही ; विनायक मेटेंचा इशारा

Vinayak Mete

मुंबई : बीडमध्ये आज शिवसंग्रामचे नेते आणि आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या नेतृत्वात मराठा मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी मेटे यांनी ठाकरे सरकार (Thackeray Government) आणि मराठा आरक्षणविषयक (Maratha Reservation) उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यावर निशाणा साधला .

येत्या ५ जुलैपर्यंत मराठा समाजाच्या (Maratha Community) मागण्या मान्य करा; अन्यथा ७ जुलैला सुरू होणारे पावसाळी अधिवेशन चालू देणार नाही, अशा शब्दांत मेटे यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ही फक्त सुरुवात आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोवर हा लढा सुरूच राहील. मराठा समाजाला EWS (आर्थिक दुर्बल घटक) आरक्षणाचा निर्णयही आपण मराठा मोर्चा जाहीर केल्यावर घेतला गेला.

त्यासाठी मी कोर्टात गेल्यानंतर सरकारने आपल्याला EWS आरक्षण दिले . त्यामुळे या सरकारला लाथा घातल्याशिवाय यांना जाग येत नाही हे आता सिद्ध झाले, असेही मेटे म्हणाले . काँग्रेसच्या (Congress) मनात मराठा समाजाबद्दल जी गरळ आहे ती काढायची झाल्यास अशोक चव्हाण यांची हकालपट्टी करा. त्यांना हाकलेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही, असेही मेटे म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button