…अन्यथा कोरोना रुग्णांसह ‘मातोश्री’च्या दरवाजावर ठाण मांडू; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Sadabhau Khot - CM Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची (Corona) संख्या वाढत चालल्याने ऑक्सिजन (Oxygen) व रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir) तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णांच्या नातेवाइकांना या गोष्टींसाठी वणवण भटकावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा येथे पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री व रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला. तसेच, दोन दिवसांत रेमडेसिवीर इंजेक्शन नागरिकांना उपलब्ध झालं नाही तर कोरोना रुग्णांसह ‘मातोश्री’च्या दरवाजावर ठाण मांडू, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.

यावेळी राज्य सरकारवर टीका करताना सदाभाऊ खोत म्हणाले की, तुम्हाला कमिशन मिळत नाही, तुम्हाला कंपन्यांकडून खंडण्या मिळत नाहीत म्हणून तुम्ही इतरांनादेखील औषध घ्यायला या राज्यात तुम्ही बंदी घातलेली आहे, जी कोंडी करण्यात आली आहे. तर, ठाकरे सरकारला मी सांगतोय ही कोंडी तुम्हाला हटवावी लागेल. ही कोंडी सरकारने जर नाही हटवली तर ज्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही, त्या सगळ्या कोरोनाग्रस्तांना घेऊन मी अचानकपणे मातोश्रीवर जाऊन ठाण मांडून बसणार आहे. सगळ्या कोरोनाग्रस्तांना मातोश्रीवर घेऊन जाण्याची तयारी करणार. दोन दिवसांत तुमच्या खंडण्या बंद करून सुरळीत पुरवठा जर नाही केला तर कोरोनाग्रस्त मातोश्रीवर येतील, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

राज्यातील दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढत आहे. दररोज हजारोंच्या संख्येत नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत, परिणामी आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे. रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्ससह, रेमडेसिवीर इंजेक्शन आदींचा तुटवडा भासत आहे. यामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत, असेही खोत यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button