…नाहीतर मायकल जॅक्सन वर्ल्ड ट्रेडसेंटर हल्ल्यात ठार झाला असता!

Michael Jackson

मायकल जॅक्सन (Michael Jackson ) पॉप कल्चरच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून त्यानं स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्याच्या वाट्याला आलेली प्रसिद्धी आणि वैभव क्वचितच कुणाच्या नशिबी असेल. डान्स आणि अल्बम्सच्या जोरावर संपर्ण जगाला आपल्या प्रेमात पाडयला लावणाऱ्या मायलकच आयुष्य जितक्या उंचावर होतं तितक्याच गुढ गोष्टी त्याच्या आयुष्यात घडल्या. त्यानं जगाचा निरोप घेवून ११ वर्ष झाली असली तरी अनेकांच्या मनात त्याच्याबद्दल कुतुहल आहे. मृत्यूनंतरही त्याच्या अल्बम्सची तुफान विक्री होतीये. वर्षाला १० अब्ज रुपये त्याची मरणानंतरही कमाई सुरुये. जगाच्या हृदयावर राज्य करणारा माइकलचं आयुष्य रहस्यच राहिलंय त्याच्यावरचा प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न.

किंग ऑफ पॉपच्या नावाने ओखळल्या जाणाऱ्या मायकल जॅक्सनचा जन्म अमेरिकेत एका गरिब कुटुंबात झाला होता. त्याच्या आईवडीलांच तो सातवं अपत्य होता.

देवावर होती प्रचंड श्रद्धा

मायकल जॅक्सन ज्या पार्श्वभूमीतून येतो ती पाहता त्याच्या आयुष्यात घडलेल्या सर्वच गोष्टी चमत्कारापेक्षा कमी नव्हत्या. त्यान आयुष्यात मिळवलेल्या सर्वच गोष्टींच श्रेय तो देवाला द्यायचा. मायकल जॅक्सची देवावर प्रचंड श्रद्धा होती. त्याच्या प्रत्येक शोच्या आधी तो प्रार्थना करायचा. पुरस्कार मिळाला की देवाचा आभार मानायचा.

त्याला अमर व्हायचं होतं

अनेकदा माईकलचा उल्लेख करताना त्याने केलेल्या शस्त्रक्रियांचा आपोआप उल्लेख होतोच. त्याचे आयुष्य वाढावं आणि नेहमी तरुण दिसावं म्हणून तो वारंवार शस्त्रक्रिया करवून घ्यायचा.

१९८३ला थ्रिलरच्या प्रचंड यशानंतर माइकल जॅक्सननं मोठी दौलत कमावली. त्याच व्यक्तीमत्व एका कलाकारापेक्षाही मोठं झालं होतं. त्याला अमर व्हायच होतं म्हणून त्याने अनेक शस्त्रक्रिया केल्यात असं त्याचा मित्रांनी अनेकदा मुलाखतीत सांगितलंय. की, “नेहमी चिरतरुण दिसण्यासाठी तो या शस्त्रक्रिया करवून घ्यायचा.”

डान्सने दिले नवे प्रकार

आज जगभरात कित्येक डान्स प्रकार आहेत. जे आधीपासून सुरु आहेत पण एखादा डान्स प्रकार कोण्या व्यक्तीच्या नावावरुन ओळखला जातो. किंवा एखाद्या व्यक्तीनं एखाद्या डान्सप्रकाराची जगाला ओळख करुन दिली असं जगाच्या पाठीवर एकही उदाहरण नव्हतं पण मायकल जॅक्सननं हे सगळच बदललंय

मून वॉक आणि गुडघा, कंबरेत, पाठीत कुठंच न वाकता ९० अंशात सरळ खाली झुकनं या गोष्टी जगासाठी फक्त एक आश्चर्य होतं आणि मायकलसाठी कला.

पेप्सीमुळं केली होती पहिली प्लॅस्टीक सर्जरी

१९८४ला पेप्सीच्या एका जाहिरातीसाठी मायकल अमेरिकेत शुट करत होता. त्यावेळी तो काही तरी गडबड झाली तो त्याचा चेहरा जमीनीवर आपटला. यामुळं त्याच्या चेहऱ्यावर जखमेचे व्रण उठले होते. ते जावेत म्हणून त्याने पहिल्यांदा प्लॅस्टिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला होता. पॉप संगिताला नवा आयाम मिळवून देणाऱ्या मायकलला नंतरच्या काळात सर्जरी करण्याचं जणू व्यसनच लागलं होतं.

वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला त्यादिवशी त्याची तिथं मिटींग होती.

११ सप्टेंबर २००१ मायकलची या दिवशी अमेरिकतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर या इमारतीत महत्त्वाची मिटींग होती. पण काही कारणाने त्याला मिटींग पुढं ढकलावी लागली. हा निर्णय त्याच्यासाठी खुप महत्त्वाचा ठरला कारण याचं दिवशी दहशतवाद्यांनी वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला केला होता. यात मायकलचा जीव जाण्याची शक्यता होती पण तो सुदैवाने वाचला.

त्याच्या मृत्यूची बातमी आली आणि सगळेच सोशल मिडीया एप्स क्रॅश झाले

संपूर्ण जगाला पॉप संगिताचं वेड लावणाऱ्या मायकलनं २५ जून २००९ला जगाचा अचानक निरोप घेतला. ही बातमी वणव्यासारखी जगभरात पसरली. जो तो हे तपासण्यासाठी ट्वीटर, फेसबूक, विकिपीडीया आणि गुगल चेक करत होता. त्यादिवशी इतकं ट्राफिक वाढलं की एकाएकी सर्वच सोशल मिडीया प्लॅटफोर्म क्रॅश झाले होते. जगातली अशी एकमेव घटना होती ज्यामुळं सर्वच सोशल मिडीया बंद काही काळासाठी बंद पडला होता.

इतकच नाही तर २.५ अब्ज लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराचे ब्रॉडकास्ट लाइव्ह पाहिलं होतं. एवढ्या मोठ्याप्रमाणात न फिफा वर्ल्ड कप न क्रिकेट वर्ल्डकप पाहिले गेले होते. जगातली अशी एकमेव घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER