‘…अन्यथा आंदोलन करू!’ चंद्रकांत पाटील यांचा ठाकरे सरकारला इशारा

Chandrakant Patil & Uddhav Thackeray

मुंबई :- भाजपाची राज्यात सत्ता असताना सरकारने जनहितार्थ घेतलेल्या सर्व निर्णयांना हे महाविकास आघाडी सरकार स्थगिती देत आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी इशारा दिला. मुंबई (Mumbai) व ठाणे (Thane) परिसरातील राज्य सरकारने दिलेल्या जमिनीवर उभ्या राहिलेल्या हजारो मध्यमवर्गीयांच्या गृहनिर्माण सोसायट्यांना जमिनीची पूर्ण मालकी बहाल करून जुन्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग सरसकट खुला करण्याचा निर्णय भाजपाच्या (BJP) सरकारने घेतला होता.

त्या निर्णयाला महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने स्थगिती दिली आहे. भाजपाचा या स्थगितीला स्पष्ट विरोध असून जनतेला लुबाडून बिल्डर लॉबीचे खिसे भरणाऱ्या या नाकर्त्या सरकारविरोधात भाजपा प्रखर आंदोलन करेल,असा इशारा पाटील यांनी दिला .दरम्यान मुंबई व परिसरात गृहनिर्माणासाठी राज्य शासनाकडून हजारो भूखंड नागरिकांच्या सोसायट्यांना पूर्वी देण्यात आले होते.

त्या जमिनींवरील सोसायटीमधील फ्लॅट विकायचा असल्यास राज्य शासनाची परवानगी घेऊन हस्तांतरण शुल्क भरावे लागत असे. तसेच या जमिनी कोणाला विकायच्या असतील किंवा त्यावरील गृहनिर्माण सोसायट्यांचे रिडेव्हलपमेंट करायचे असेल तरीही शासनाची परवानगी घेऊन हस्तांतरण शुल्क भरावे लागत असे. या नियमांच्या गुंतागुंतीमुळे या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता. ही समस्या ध्यानात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या जमिनी भोगवटादार वर्ग-२ मधून वर्ग-१ मध्ये करण्यास भाजपा सरकारने ८ मार्च २०१९ रोजी परवानगी दिली होती.

ही बातमी पण वाचा : …गावागावात फिरणं मुश्कील होईल; पडळकरांचा ठाकरे सरकारला इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER