
सांगली : विधानसभेच्या निवडणुकीत मी कोथरूडला अडकलो, त्यामुळे इस्लामपुरात लक्ष देता आले नाही. आमच्यात मतभेद नसते तर जयंतरावांची सुट्टी केली असती, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर केली. इस्लामपुरमध्ये कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, जयंत पाटील राज्याचे नव्हे तर तालुक्याचे नेते राहिले असते. आगामी निवडणुकीत पाहूच. माझ्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय अजित पवार आणि जयंत पाटील यांचे भाषण पूर्ण होत नाही. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा आहे, याबद्दल तुम्ही काय बोलला होता हे जाहीररित्या सांगायची वेळ आणू नका, सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला