अन्यथा दिल्लीला धडक मारु : राजू शेट्टी यांचा इशारा

कोल्हापूर : दिल्लीमध्ये आंदोलन करणारे शेतकरी एकटे नाहीत. तेथील शेतकऱ्यांच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्यांना पाठींबा देण्यासाठी कोणत्याही क्षणी दिल्लीला कूच करु. हे दर्शविण्यासाठीच बळीराजाच्या फौजेचे हे संचलन होते, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी सोमवारी दिले. कृषी कायद्याविरोधात बळीराजा जीवाची बाजी लावून लढत असताना संसदेत आणि रस्त्यावरील आंंदोलनातही विरोधीपक्ष नरमाईची भूमीका घेत असल्याचे आश्चर्य शेट्टी यांनी व्यक्त केले.

शेट्टी यांच्या नेृत्वाखाली सांगली ते कोल्हापूर अशी ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. सात तासांच्या प्रवासानंतर दसरा चौकात राजर्षी शाहू यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन रॅलीची सांगता झाली. यावेळी भाषणात म्हणाले, शेतकऱ्याला गुलाम बनविण्याचे कारस्थान नव्या कृषी कायद्याच्या आडाने सुरु आहे. हे कारस्थान शेतकरी सहन करणार नाही, हाच इशारा या रॅलीच्या माध्यमातून दिला आहे. बळीराजा नको असलेल्या कायद्याविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना १४७ शेतकऱ्यांचा जीव गेला, याची दखल कोणी घेत नाही? अशा प्रकारे बेदखल केल्याने शेतकऱ्यांत विद्रोह निर्माण झाल्यास तो देशाला परवडणारा नाही. त्यामुळेच राज्यकर्त्यांनी सावध रहावे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER