अन्यथा वीज बिल भरू नका : डॉ. एन. डी. पाटील यांचे आवाहन

Kolhapur

कोल्हापूर : महावितरण कंपनीकडून वाढीव वीज दरवाढ रद्द होऊन वीज बिले माफ होत नाहीत तोपर्यंत राज्यातील शेती, घरगुती व उद्योगधंद्यातील वीज ग्राहकांनी वीज बिले भरू नयेत, असे आवाहन ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांनी रविवारी कोल्हापूरात सर्वपक्षीय बैठकीत केले. एन डी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित सर्वपक्षीय बैठकीत झाली. १० ऑगस्ट रोजी या विरोधात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. सर्वपक्षीय कृती समितीद्वारे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

कोल्हापूर येथील शाहू कॉलेजमध्ये ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती वीज बिल दरवाढीविरोधातील आंदोलन बाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी सर्वपक्षीय कृतीसमितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये लॉकडाऊनच्या काळात भरमसाठ वाढीव वीजबिले आलेली आहेत. या वीजबिलामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. जोपर्यंत महावितरण कंपनीकडून वाढीव वीज दरवाढ रद्द होऊन वीज बिले माफ होत नाहीत, तोपर्यंत राज्यातील शेती, घरगुती, उद्योगधंद्यातील वीज ग्राहकांनी वीज बिले भरू नयेत, असा निर्णय आजच्या सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला.

माजी खासदार राजू शेट्टी, महापौर निलोफर आजरेकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER